Latest Listings ( Less known Marathi Words )

डूख धरणे

Dukh Dharane

Bhandara District, Gondia District, Chandrapur District

बदला घेण्यासाठी एखादी गोष्ट मनात साठवणे.

तोंडपाटीलकी करणे

Tondpatilki Karne

Maharashtra

फक्त मोठ्या बाता करणे.

काशी करणे

Kaashi Karne

Maharashtra

घोळ घालणे, पंचाइत करणे

झ्यामल झ्यामल करणे

Jhyamal Jhyamal Karane

Chandrapur District, Bhandara District

एखाद काम करत आहे अस दाखवणे, पण Output काहीच नसणे. e.g. काय झ्यामल झ्यामल करत आहेस बे ?

मुखूर मुखूर हसणे

Mukhur Mukhur Hasane

East Vidarbha

म्हणजे गालातल्या गालात हसणे किंवा मनातल्या मनात हसणे.

करतूक करणे

Karatuk Karane

East Vidarbha

करणी करणे

लूप लूप करणे

lup lup karne

Bhandara District

घाबरणे. e.g. समोर वाघ दिसल्यावर माझी छाती लूप लूप करत होती.

कला करणे

Kala Karane

Bhandara District

कला करणे = to be angry शु. म. - रागावणे वा.उ. - 1. लवकर येजो नाहीत मंग माई मा कला करते

पोतारा मारणे

Potara Marane

Bhandara District

समानार्थी शब्द- सारवने पोतारा मारणे (verb) - coloring the wall or floor using whitewash or cow dung शु. म. - चुन्याने किंवा शेणाने भिंतींना/घरातील तळ भागाला सफेदी करणे वा.उ. - १. दिवाळीत घराले *पोतारा* तं मारावाच लागंल २. *पोतारे* मारावचे दिवस

जीव उलार - वालार होणे

ular walar

Bhandara District, Chandrapur District

जीव घाबरणे, किंवा खूप अस्वस्थ वाटणे. उदा. ऊन ( तपन ) हो का काहोजी हे, जीव कसा उलार - वालार लागून राहिला आहे !